Top News

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र

महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवनचरित्र



पूर्ण नाव (Name):-     ज्योतिराव गोविंदराव फुले

टोपणनाव:-        जोतीबा, महात्मा

मूळ आडनाव:-    गोऱ्हे

जन्म(Born):-     11 एप्रिल 1827

जन्मस्थान(Birthplace):-    कटगुण,ता.खटाव जि.सातारा,महाराष्ट्र, भारत

मूळ गाव:-        कटगुण

मृत्यू:-        28 नोव्हेंबर 1890

मृत्यूस्थान:-    पुणे, महाराष्ट्र

वडिलांचे नाव:-    गोविंदराव फुले

आईचे नाव:-    चिमणाबाई फुले

पत्नीचे नाव(Wife Name):-    सावित्रीबाई फुले

मुले:-        यशवंत फुले

➢सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती –

 👉जन्म11 एप्रिल 1827 रोजी 

 👉जन्म गाव :-मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण

👉वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई 

👉महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते यांना भाजी विक्रेते आणि फुलवाले म्हणून ओळखत होते, त्यामुळे त्यांचे मूळ आडनाव गोऱ्हे असले तरी त्यांना पुढे फुले या आडनावाने ओळखले जाऊ लागले.

👉कुटुंब पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे शिफ्ट झाले. खानवडी येथे त्यांचे स्वतःचे घर आहे, फुले आडनावाची बरीच कुटुंबे त्या ठिकाणी आहेत.

➢महात्मा ज्योतिबा फुले -

👉महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांना महात्मा ज्योतिबा फुले या नावाने देखील ओळखले जाते. 

 👉एक भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातीविरोधी समाजसुधारक आणि महाराष्ट्रातील लेखक होते.

👉त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, जातीव्यवस्था आणि महिलांसाठी शिक्षण अशी अनेक सामाजिक कार्य केली.

👉दलित जातीतील लोकांना समान हक्क मिळावा म्हणून त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. त्यामध्ये सर्व धर्म आणि जातीतील लोक या संघटनेचा एक भाग बनू शकले.

👉फुले यांच्या कामामध्ये त्यांच्या पत्नीचा पण खूप मोलाचा वाटा आहे. ते आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले हे भारतातील महिला शिक्षणाचे जनक आहेत. आज भारतामध्ये ज्या मुली शिक्षण घेत आहेत, त्याचे सर्व श्रेय फुले यांना जाते.

महात्मा ज्योतिबा फुले यांची माहिती – 

👉फुले नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. महात्मा फुले यांचा विवाह अवघ्या वयाच्या 13 व्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला.

👉प्राथमिक शिक्षणाबरोबर काही काळ भाजी विक्रीचा व्यवसाय केला. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी 1842 मध्ये पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला.

👉बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. फुले यांनी 1847 मध्ये इंग्रजी शिक्षण पूर्ण केले.

👉फुले हे करारी वृत्तीचे होते. त्यांना गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत.

👉परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विध्यार्थी म्हणून त्यांचा नाव लौकिक होते.

👉1848 मध्ये जेव्हा आपल्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाला गेले, तेव्हा त्यांच्या आयुष्यातील तो क्षण खूप महत्त्वपूर्ण ठरला.

👉कारण, लग्नामध्ये मित्राच्या आई-वडिलांनी त्यांना तुच्च लेखले. खालच्या जातीचा म्हणून त्यांचा अपमान केला आणि लग्नाच्या सोहळ्यापासून दूर राहण्यास सांगितले.

👉या घटनेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी ठरवले कि, अशी जाती व्यवस्था मुळापासून मोडून काढायची.

सामाजिक कार्य -

संघटना:-सत्यशोधक समाज

प्रमुख्य कार्य:-नीतिशास्त्र, मानवतावाद, शिक्षण, सामाजिक सुधारणा

प्रमुख स्मारके:-भिडे वाडा, गंज पेठ ,पुणे

भाषा:-मराठी

धर्म:-हिंदू माळी

राष्ट्रीयत्व:-भारतीय

अस्पृश्यता, जातीव्यवस्था निर्मूलन, महिला, दलितांचे शिक्षण आणि पायदळी तुडवणाऱ्या महिलांचे कल्याण यासह अनेक बाबींचा समावेश होता.

शैक्षणिक कार्य – Educational work

👉महात्मा फुले  शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या प्रसिद्ध ओळी -

विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।

👉1848 मध्ये, वयाच्या 23 व्या वर्षी फुले यांनी ख्रिश्चन मिशनरीज चालवलेल्या अहमदनगरमधील पहिल्या मुलींच्या शाळेत भेट दिली. 

👉1848 मध्ये थॉमस पेन यांचे मानव हक्क राइट्स ऑफ मॅन वाचले आणि त्यांच्या मनी सामाजिक न्यायाची तीव्र भावना निर्माण झाली.

👉त्यांना समजले की भारतीय समाजात दलित जातीतील महिला यांचे नुकसान होत आहे आणि त्यांचे शिक्षण त्यांच्या शोषण मुक्तीसाठी समाजामध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.

👉बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून समाजातील सुधारणा करण्याचा निश्चय केला.

👉1848 मध्ये पहिली मुलींची शाळा भिडे यांच्या वाड्यात पुणे या ठिकाणी चालू केली आणि शाळेची जबाबदारी फुले यांच्या पत्नी सावित्रीबाईं यांच्यावर सोपवली.

👉त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी 1852 मध्ये दुसरी शाळा वेताळ पेठ पुणे या ठिकाणी चालू केली. त्यांच्या या कार्यास सनातन लोकांकडून खूप त्रास झाला, पण कठोर बुद्धीचे महात्मा फुले यांनी माघार घेतली नाही.

👉जोतीरावांनी पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी नेमणूक झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याच प्रमाणे महिलांसाठी स्वतंत्र शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.

👉महात्मा ज्योतिबा फुले यांनी ओळखले होते कि, शिक्षण हे सर्वांगीण विकासाचं माध्यम आहे कारण शिक्षणामुळेच समाजाला एक नवी दृष्टी देता येईल आणि समाजातील अंधश्रद्धा रूढी परंपरा व सामाजिक भेद दूर करता येतील.

👉शिक्षणामुळे अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने आपल्या अस्तित्वाची जाणीव होईल, याची जाणीव महात्मा फुले यांना होती.

महात्मा ज्योतिबा फुले – 

महिलांचे कल्याण – 

👉1863 मध्ये उच्च आणि गर्भवती विधवांसाठी सुरक्षित ठिकाणी जन्म देण्यासाठी अनाथ आश्रम सुरू केले. त्यांच्या अनाथाश्रमांची स्थापना बालहत्येचे प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नातून झाली.

👉1864 मध्ये पुण्यात गोखले बागेत विधवा महिलांसाठी पहिला पुनर्विवाह घडवून आणला.

👉फुले यांनी अनाथ आश्रम उघडून कनिष्ठ जातींच्या आसपासच्या सामाजिक अस्पृश्यतेचा कलंक मिटविण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या विहिरीचा उपयोग दलित जातीतील लोकांना पाणी देण्यासाठी केला.

सत्यशोधक समाज – Satyashodhak Samaj

👉समाजातील विषमता नष्ट करणे 

👉तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, शूद्र आणि दलित लोकांचे हक्क मिळवून देण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ साली महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.

👉सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली.

👉चळवळीत सावित्रीबाई यांनी महिलांचे नेतृत्व केले, त्यांच्या बरोबर आणखी १९ महिलांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले.

👉पुण्यातील दीनबंधू या वृत्तपत्राने समाजाच्या विचारांना आवाज दिला. त्यांनी महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत हि चळवळ पोहचवली.

👉या चळवळीला छत्रपती शाहू महाराजांनी पाठींबा दिला. न्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

👉सत्यशोधक समाजाचे घोषवाक्य 

‘सर्वसाक्षी जगत्पती ।
त्याला नकोच मध्यस्ती ॥

👉सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली.

महात्मा ज्योतिबा फुले यांची महत्वाची कामे --

👉 : शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा. –1848 

✅ : शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्‍नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग. – 1849 

👉 : मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्‍या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण. – 1849 

✅ : चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना. – 1851 

👉 : थॉमस पेन यांच्या ‘राईट ऑफ मॅन’ या ग्रंथाचा अभ्यास. – 1847 

✅ : मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला. – 1848 

 👉: भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले. – 1848 

👉 : भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात. – 1851 

👉 : पूना लायब्ररीची स्थापना. – 1852 

✅ : वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली. – 1852 

👉 : रात्रशाळेची सुरुवात केली. – 1855 

✅ : विधवाविवाहास साहाय्य केले. – 1860

👉 : बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. – 1863

✅ : गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला. – 1864

👉: दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. – 1868

✅ : सत्यशोधक समाजची स्थापना केली. – 1873

👉 : शेतकर्‍यांच्या शोषणाविरुद्ध खतफोडीचे बंड घडवून आणले ( अहमदनगर). – 1875 

✅ : स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य केले. – 1875

 👉: पुणे नगर पालिकेचे सदस्य होते. – 1876 ते 1882

✅ : दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला. – 1880

 👉: ‘विल्यम हंटर शिक्षण आयोगा’ समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. – 1882

✅ : सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली. – 1887

👉: मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली. – 1888

मृत्यू – Death

👉ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य ब्राह्मणांच्या शोषणापासून अस्पृश्यांच्या मुक्तीसाठी वाहिले. उच्चवर्णीयांच्या गुलामगिरी विरुद्ध त्यांनी बंड केले.

👉28 नोव्हेंबर, 1890 रोजी भारताचे महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन झाले.


👉हे लक्षात  ठेवा :-

https://gaulanv2021.blogspot.com/2024/01/blog-post_18.html

https://gaulanv2021.blogspot.com/2024/01/blog-post_12.html
https://gaulanv2021.blogspot.com/2024/01/blog-post_11.html

https://gaulanv2021.blogspot.com/2024/01/blog-post_45.html

Post a Comment

Previous Post Next Post