संपूर्ण मराठी व्याकरण प्रश्न
1) ‘वाघ्या’ या शब्दाच्या विरुध्दलिंगी शब्द ओळखा.
1) वाघीण
2) वाघी
3) मुरळी
4) मुरळीण
2) “खाई त्याला खवखवे” या म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा.
1) चोराच्या मनात चांदणे
2) उथळ पाण्याला खळखळाट फार
3) नाचता येईना अंगण वाकडे
4) करावे तसे भरावे
✅उत्तर :- 1)चोराच्या मनात चांदणे
3) ‘दुर्लक्ष करणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?
1) कान टोचणे
2) कानाडोळा करणे
3) कानात तेल घालून झोपणे
4) कानाला खडा लावणे
✅उत्तर :- 2)कानाडोळा करणे
4) ‘ज्याला आई, वडिल नाहीत असा असलेला’ या शब्दसमुहासाठी योग्य पर्याय निवडा.
1) सनाथ
2) दुबळा
3) पोरका
4) वनवासी
✅उत्तर :- 3)पोरका
5) व्याकरणाच्या नियमानुसार बरोबर शब्द कोणता, ते लिहा.
1) दु:दैवी
2) दुदैवी
3) दुर्दैवी
4) दुर्वेवी
✅उत्तर :- 3)दुर्दैवी
Post a Comment